Published On : Mon, Jul 6th, 2020

रोग प्रतिकार शक्ती वाढावी याकरीता गोळयाचे वाटप

Advertisement

रामटेक -महाराष्टात कोरोना 19 आजाराचे थैमान घातलेले आहे आज शहरात आढळणरा आजार ग्रामिण भागात ही आजाराने डोंके काढलेले आहे आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी आरोग्याचे सर्व नियम पाळुन या आजारा विरूध लढत आहे.

व नागरीकांना आरोग्याचे नियम पाळण्या विषयी वारवार सांगत आहेत. शासन निर्णय वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दिनांक 08 जुन 2020 च्या शासन निर्ययात नमुद शक्ती वाढविण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्या करीता होमीयोपॅथीक औषधी अर्सेनिकम अल्बम – 30 ग्लोब्युल्स ,गोळया उपकेंद्र डोंगरी अंर्तगत येणा-या सर्व सहा गावामधील नागरीकांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी याकरीता किशोर वैद्य आरोग्य सेवक, कमलेश शरनांगत सामाजिक कार्यकर्ता यांनी मिळुण अर्सेनिकम अल्बम – 30 च्या गोळया वाटप करण्यात आल्या हया गोळया गावातील आशास्वंयमसेविका श्रीमती कल्पना हटवार , गणिता मेश्राम, व सुनिता मोरेशिया यांनी गावातील नागरीकांना गोळ्या वाटप करुन सकाळ संध्याकाळी पाच पाच गोळ्या उपाश्यापोटी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. यापुर्वी किशोर वैद्य यांनी उपकेंद्र डोंगरी अंर्तगत येणा-या सर्व सहा गावामधील नागरीकां माक्स वाटप करण्यात आले होते