Published On : Fri, Aug 23rd, 2019

शेतकरी मानधन योजना लाभार्थ्यांना पेन्शन कार्ड वितरण

कामठी :-शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकरी मनीष राऊत रा रनाळा तालुका कामठी यासह इतर शेतकऱ्याना आज कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या हस्ते कामठी तहसील कार्यालयात पेन्शन कार्ड चे वितरण करण्यात आले.

18 ते 40 वर्षे वयोगटातील 2 हॅकटर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी (एसएमएफ)या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत .पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे .लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्याची सुद्धा तरतुद या योजनेत आहे .या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी आजपासून तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिबिरे राबविणे सुरू करण्यात आले असून 25 ऑगस्ट पर्यंत विशेष शिबीर रांबविन्यात येत आहेत ही मोहोम 26 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी असे आव्हान एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह 55 ते 200 रुपये रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.यात केंद्र शासनाकडून सुद्धा लाभार्थ्यद्वारे जमा केलेली रक्कम जमा करण्यात येईल.गाव पातळीवर सुविधा केंद्र(कॉमन सर्व्हिस सेंटर)लाभार्थी नोंदणी करण्यात येत आहे .नोंदणीनंत र लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हास्याची रक्कम ऑटो डेबिटने विमा कंपनी कडे जमा होईल अशी माहिती तहसिलदार अरविंद हिंगे यांनी दिली.

बॉक्स:-या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड , गाव नमुना आठ, बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा , पत्नीचे नाव इत्यादि माहिती सोबत आणावी, नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान सम्मान योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे .शेतकऱ्याची पडताळणी त्याच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपी द्वारे होणार आहे.

संदीप कांबळे कामठी