| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 22nd, 2020

  राष्ट्रीय जनसुराज्य पक्षातर्फे झुलर गावातील पूरग्रस्त नागरिकांना अन्यधान्य व साहित्याचे वाटप

  काही दिवसापूर्वी कन्हान ड्याम चे पाणी कन्हान नदीत सोडण्यात आले, याची माहिती गावकर्यांना रात्री अकरा वाजता देण्यात आली, त्यामुढे नागरिकांना घर सोडणे या व्यतिरिक्त दुसरा कोणता ही पारियाय नव्हता.

  जनतेला सडो कि पडो होऊन गाव सोडावे लागले, या महापूरमध्ये जनतेचे घरातील संपूर्ण साहित्य, पशुधन, सर्व साहित्य वाहून गेले अशा अडचणीच्या कांडात गावकर्यांना त्याच्या उपजीविकेसाठी राष्टीय जनसुराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी काकडे यांच्या व दान दातांच्या साहाय्याने झुलर या गावी 107 पूरग्रस्त ताना गहू, तांदूळ, व सोडा प्रकारचे किराणा साहित्य ब्लँकेट, साडी व कपडे वितरित करण्यात आले.

  या मुडे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मीडाला, पूरग्रस्त गावकऱ्यांसाठी साहित्य नेणाऱ्या गाडीला सुरुची मसाल्याचे संचालक प्रकाश कटारिया यांनी हिरवी झेंडी दाखवली, या वेडी सुभाष मुनोत, रमेश मोहनाने, प्रताप वासनिक, उपस्थित होते. झुलर या गावामध्ये साहित्य वाटप करते वेडी राष्ट्रीय कार्यकारणी सदयस, जनाब जैन उल्हास शहा, अजय शर्मा, प्रवीण उराडे, हरीण निमजे, प्रीती डंभारे, विदर्भ महिला अध्यक्षा अमिता भिवगडे, वडोदा सर्कल अध्यक्ष सोपान वानखेडे, संजय अंबाडकर, सूर्यकांत चौधरी, उपस्थित होते, तर रोशन शाहू, शिवप्रसाद राऊत, प्रवीण डंभारे, सुचिता बागलेकर, लीना येरपुडे, मनीषा घोडमारे, अभिलाषा पाटील, रुपाली वाघ, यांनी कार्यक्रम यशस्वी केला, या कार्यक्रमा ला झुलर माझी सरपंच वानखेडे, ग्रामपंचायत चे सद्यस्य उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145