Published On : Tue, Jun 8th, 2021

भारवाहकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

-रेल्वेस्थानकावर लोककल्याण समितीचा उपक्रम

नागपूर: कोरोनाच्या पृष्ठभूमीवर टाळेबंदीमुळे रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली. प्रवाशांचाही प्रतिसाद नाही. प्रवाशांवर ज्यांचे पोट आहे, असे भारवाहक (कुली) आणि चर्मकार बांधवांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीतर्फे रेल्वेस्थानकावर काम करणारे भारवाहक आणि चर्मकार बांधवांना धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.1

कोरोनामुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत भारवाहकांना जगण्यासाठी लोककल्याण समितीने मदतीचा हात दिला. यापूर्वी सुद्धा असाच उपक्रम राबविण्यात आला. किराणा, रेशन आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या.1

कार्यक्रमाला नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर कार्यवाह अरविंद कुकडे, सेवाकार्य प्रमुख माधव उराडे, तसेच मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे स्टेशन निदेशक दिनेश नागदेवे, मुख्य वाणिज्य निरीक्षक श्रीनिवास घोटकर व प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे उपस्थित होते. यावेळी भारवाहकांनी लोक कल्याण समिती व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

रेल्वे मंत्र्यांना ट्विट, फ्रंटलाईन स्टाफ घोषित करा, पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
आम्हालाही फ्रंटलाईन स्टाफ घोषित करा अशी मागणी मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे कर्मचाèयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे केली. रेल्वे मंत्रालयाने केवळ आरपीएफ आणि रेल्वे रुग्णालयातील कर्मचाèयांना फ्रंटलाईन स्टाफ घोषित केले आहे. या पृष्ठभूमीवर हजारो रेल्वे कर्मचाèयांनी ट्विट करून मागणी केली.

ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनच्या आवाहनानुसार नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वेतील लाखो कर्मचाèयांनी रेल्वे कर्मचाèयांना फ्रंटलाईन स्टाफ घोषित करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, आरोग्य मंत्री यांना ट्विट केले. वेणू नायर यांनी म्हटले की, देशात पहिली टाळेबंदी लागल्यापासून रेल्वे कर्मचाèयांनी आपल्या जिवाची पर्वा न करता देशाची सेवा केली. देशात सर्वत्र औषधी, खाद्यपदार्थ, पेटड्ढोल, डिझेल, कोळसा आणि श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविले.

दुसèया टाळेबंदीत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम केले. तरी सुद्धा केंद्र शासन रेल्वे कर्मचाèयांना फ्रंटलाईन स्टाफ घोषित करण्यासाठी कुठलीच हालचाल करीत नाही. कोरोनामुळे हजारो रेल्वे कर्मचाèयांनी आपला जीव गमावला. त्यामुळे रेल्वे कर्मचाèयांना त्वरित फ्रंटलाईन स्टाफ घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर मुख्यालयात कार्यकारी अध्यक्ष हबीब खान, विभागीय सचिव सुनील झा, संघटक ई. व्ही. राव यांनी अभियानाचे नेतृत्व करून हजारो कर्मचाèयांना ट्विट करण्यासाठी मदत केली.