Published On : Sun, Apr 26th, 2020

कन्हान कांद्री च्या स्वच्छता कर्मचा-यांना मास्क व साबनाचे वितरण

Advertisement

कन्हान : – आपात्काळ सामाजिक संघ टन कन्हान व्दारे एक हात मदतीचा म्हणु न नगरपरिषद कन्हान- पिपरी व कांद्री ग्राम पंचायत येथील स्वच्छता कर्मचा-या ना मास्क व साबणाचे वितरण करून सेवाभावी मदत करण्यात आली.

संपुर्ण देशात कोरोना विषाणुच्या महामारीचे संकटाचे सावट असताना सुध्दा दररोज कन्हान व कांद्री परिसराची पहाटे सकाळपासुन दुपारपर्यंत स्वच्छता कर्मचारी निसंकोच आपली कामगिरी बजावित परिसर स्वच्छ ठेवत आहे. अश्या खऱ्या यौध्दांना आपात्काळ सामा जिक संघटन कन्हान व्दारे मॉस्क व साब णाचे वितरण करून स्वत: सोबत दुस-यां ची सुरक्षा व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी कन्हान नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेंद्र (बाबु) रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, आपात्काळ संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वानखेडे, अशोक बनकर, पवन माने, सिल्वेस्टर जोसेफ, विनोद कोहळे, अजय गायकवाड, शिवशंकर वानखेडे, राजु गडे प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे आपात्काळ सामा जिक संघटन कन्हान व्दारे एक हात मदतीचा म्हणुन लॉकडाऊन काळात नियमित सेवा कार्य करित आहे.

Advertisement
Advertisement