मुलीचा वाढदिवस केला असा साजरा
कामठी :-नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील उपविभागीय दंडाधिकारी हिरामण झिरवाळ यांनी आपल्या मुलीचा 14 एप्रिल रोजी असणाऱ्या वाढदिवस रद्द करून या कार्यक्रअंतर्गत होणारा खर्च गोरगरीब असे ससेगाव, खेतापुर तालुका कूहीं येथील रोजांदारिने काम करनारे गोपाळ समाजातील 119 कुटूबाना जिवणाावश्यक वस्तूचा व धान्याचे वाटप करण्यात आले.
सदर वाटप करताना सवंगडी कला मंच , गोठणगाव, कूही या संस्थेचे खूप मोठे सहकार्य देखील लाभले..सविस्तर वृत्त याप्रमाणे की कोविड 19 या वीषाणुचा प्रा दुभार्भावमुळे संपूर्ण lock down असताना कामे बंद झालेली आहे . यात रोजंदारिने काम करणारे तालुका कुही , नागपूर येथील मौजा ससेगाव, खेतापूर येथे गोपाळ समाजातील अनेक कुटुंबांना उपासमारी ची पाळी आली .
हे पाहून श्री हिरामण झिरवाळ , उपविभागीय अधिकारी उमरेड यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस रद्द करून यावरील खर्च या लोकांना जीवनवश्यक वस्तूंचे व धान्य वाटप केले, यावेळी कुही तहसिलदार बाबाराव तीनघसे, नायब तहसिलदार उपेश अंबादे, मंडळ अधिकारी भास्कर बेले, हिन्दलाल उके,संजय तोटे, उपसभापती श्रिरामे, कैलास हुडमे ,तलाठी पडोळे, कोठे, डोये, कर्मचारी रंगारी, शंभरकर, सहारे, बुरुडे ,दत्तू कुकडे व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी










