नागपूर. दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मते यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता.२८) भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण नागपूर आणि शहर पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे गरजूंना कंबल वितरण करण्यात आले.
याप्रसंगी दक्षिण मंडळ अध्यक्ष देवेन्द्र दस्तुरे, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हत्तीबेड, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, महामंत्री नगरसेवक नागेश सहारे, माजी शहर संगठन मंत्री भोजराज डुंबे, मोर्चाचे दक्षिण मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर केळझरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रभाकर मेश्राम, शहर कोषाध्यक्ष शरद पारधी, मंत्री बंटी पैसाडेली, संपर्क मंत्री संगपाल काळे, हिमांशू पारधी, उपाध्यक्ष संदीप बेले, अमित गांजरे, महामंत्री कैलास धोंगडे, बालाभाऊ माने, रमेश कांगो, शिवपाल खवशी, दीपक साकुलकर आणि इंजि सत्यांन कातरकर उपस्थित होते.

