| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 15th, 2019
  amchi nagpur | By Nagpur Today Nagpur News

  जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे १०० व्यक्तींना संविधान पुस्तकाचे वाटप

  नागपूर : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यात कार्यरत समाजातील विविध क्षेत्रातील १०० प्रमुख मान्यवरांना भारतीय संविधानचे पुस्तक देण्यात आले.

  माजी महापौर प्रवीण दटके,रेशीमबाग हेडगेवार स्मारक समिती परिसराचे व्यवस्थापक अजय जलतारे,अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, डॉ. निलेशजी चांगले, कोतवाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले,चेतन कायरकर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे.

  या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मनीष मेश्राम, संस्थेचे सचिव तुषार महाजन,कोषाध्यक्ष चंदू धांडे, सहसचिव निखिल कावळे, डॉ. सुमित पैडलवार, प्रचार प्रसिद्धी प्रमुख अभिजित सरोदे, क्रीडा प्रमुख विलास मसरे,स्वरूप कोडमलवार,मयूर शेंडे यांनी सहकार्य केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145