Published On : Sun, Apr 5th, 2020

जिवनावश्यक वस्तूंचे गरजू गरीबांना साहित्य वाटप.

Advertisement

रामटेक : रामटेक तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय देवलापारचे नायब तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ एप्रिल रोजी अत्यंत जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नायब तहसीलदार आडे यांनी पुढाकार घेऊन देवलापार व पवनी येथील व्यापारी व दानदाते यांच्याशी संपर्क करुन व साहित्य गोळा ७२ गावात २९८ गरजू व गरीब कुटुंबांना घरपोच साबून, तांदूळ, गहू,आटा,दाळ,हळद,मिर्ची पावडर व अन्य अत्यंत जिवनावश्यक वस्तू व सामग्रीचे वाटप करण्यात आले.

साहित्य सामग्री गोळा करून वाटप करण्यासाठी देवलापारचे नायब तहसिलदार प्रदिपकुमार आडे, ग्रामपंचायतीचे सचिव भारत मेश्राम ,अप्पर तहसील कार्यालय देवलापारचे कनिष्ठ लिपिक विवेक आडे,कोतवाल, संजय उकुंडे,जमीर शेख,विनोद मोंढे,बापूराव विरसाम,सुनील ठवकर,सोनटक्के,नरेश उईके,दिपक दुनेदार, शुभम कोकण,दिपक मसराम,निलेश हिरकणे,प्रदिप इनवाते व इतर यांनी सहकार्य केले.