Published On : Mon, Oct 9th, 2017

नागपुरच्या सुपुत्राला दिल्लीत वायूसेना दिवशी विशिष्ट सेवा पदकाचा सन्मान

Advertisement

नागपुर(अंबाझरी):नागपुरातील अनेक गुणवंतानी आपल्या कर्तुत्वाने आपल्या कुटुंबिया सोबत नागपुर शहराचेही नाव देश, विदेशातही गौरवांवित केले आहे, त्यातच एक अजुन भर पडली असून नागपुरात जन्म व शिक्षण घेऊन वायुसेनेत दाखल होऊन आपल्या उत्कृष्ट कार्या चे प्रदर्शन करणाऱ्या अभिजीत नेने यांना वायु सेना तर्फे वायु सेना दिनी 8 ऑक्टोबर ला दिल्लीत विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

8 ऑक्टोम्बर या भारतीय वायुसेना दिवशी वायुसेना आपल्या निवडक अधिकारी व कर्मचार्यांना दिल्लीत एका मोठ्या समारोहात विविध पदकांनी सन्मानित करीत असते.काल दिल्ली येथिल समारोहात भारताचे राष्ट्रपति यांचे वतीने नागपुरचे ग्रुप कॅप्टन अभिजीत नेने याना वायु सेना प्रमुख बी.एस धनोवा यांचे हस्ते व इतर मान्यवारांच्या उपस्थितित हे पदक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ग्रुप कॅप्टन अभिजीत नेने यांचा जन्म नागपुरात झाला असून डॉ एस जी नेने यांचे ते सुपत्र आहे, नागपुरतील शिक्षणा दरम्यान त्यांची पुणे स्थित खडकवासला येथील नेशनल डिफेन्स अकॅडमित निवड झाली. यशस्वी प्रशिक्षना नंतर ते वायुसेनेत दाखल झाले.तेंव्हा पासून 24 वर्षाच्या सेवेत त्यांनी वायुसेनेत उत्कृष्ट कामगिरी बजाविली आहे, वायु सेनेचे जगवार ,सु-30,सारखे लढाऊ विमान उडविंन्यात ते कुशल आहेत,4500 तासांचा विमान उडविंण्याचा त्याना अनुभव आहे,त्या सोबत समुद्री उड्डाण, एयर टू एयर ,रेस्क्यु ई चा दीर्घ अनुभव असून, देशासह, सिंगापूर एथेही त्यांनी सेवा प्रदान केली आहे.

या सोबत अभिजीत नेने हे व्यावसायिक दर्जा प्राप्त विमान प्रशिक्षक देखील असून वायुसेनेत ते नवीन निवड झाले्ल्या वैमणिकाना प्रशिक्षण देखील देतात.त्यांचा या उत्कृष्ट कार्य व अनुभवाची वायुसेनेने दखल घेऊन या पुरस्काराची निवड त्यांच्या कुटुंबिया सोबतच नागपुरकरसाठी देखील अभिमानाचि बाब आहे.त्याना मिळालेला पुरस्कार व नागपुरचे नाव गौरवांवित केल्याबद्दल आमदार परिणय फुके,माजी सीनेट सदस्य एड.मनमोहन बाजपेयी, शिक्षक नेते प्रा.सुभाष खाकसे, एन आइ टि स्विमर्स मेम्बर्स संघटनेचे पदाधिकारी मेघना कालगावकर, रवलिंन खुराना, शिरपुरकर,अभिजीत च्या आई मंगला नेने , विंग कमांडर ( सेवा निवृत) समीर कालगावकर, दाते व देशपांडे परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.