Published On : Mon, Oct 11th, 2021

दुर्गा प्रतीमा स्थापणे हेतू मंडळाला परवानगी देण्यासाठी विलंब केल्याने नाराजगी

– न.प.अधिकारी व शिवसेना पदाधिकार्यात बाचाबाची , मुख्याधिकार्‍यांनी अनावश्यक पद्धतीने परवानग्या थांबविल्या – हर्षल काकडे

वाडी : वाडी नगरपरिषद क्षेत्रात सार्वजनिक स्थळांवर माॅं दुर्गा प्रतीमा स्थापनेसाठी नगरपरिषदेने विलंब व व्यत्यय निर्माण केल्याने शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकार्यात रोष दिसून आला.

प्राप्त माहितीनुसार नवरात्र उत्सवानिमित्त माॅं दुर्गा प्रतिमा स्थापने हेतू शासना द्वारा योग्य दिशा निर्देश जारी करण्यात आले आहेत.हे निर्देश व कोरोना नियमाला लक्षात ठेवून वाडी न.प. प्राप्त होणाऱ्या अर्जांवर कार्यवाही करून अनुमती प्रदान करीत आहे.वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले ने ही अनुमति प्रदान करण्याची जबाबदारी उपमुख्याधिकारी रत्नमाला फटिंग यांना दिली आहे.वाडीत मोठ्या संख्येने माॅं दुर्गा प्रतिमांचे सार्वजनिक रूपात मंडळा द्वारा स्थापना केली जाते.गुरूप्रसाद नगर क्रीडा मैदानावर ही दरवर्षी उत्कृष्ट सजावटी सह मंडळ प्रतिमा स्थापन करून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करते.

यावर्षीही मंडळाद्वारे जेव्हा नगरपरिषदेला परवानगी हेतु आवेदन करण्यात आले तेव्हा नगरपरिषदे च्या वतीने या अर्जात त्रुटी असल्याचे सांगून थांबविण्यात आले.ही माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेने चे जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांना दिली असता ते आपले सहकारी शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासने, संघटक संतोष केचे,अखिल पोहनकर,समीर मेंढे,दामोदर जोध,अखिलेश पांडे इत्यादी सह मंडळाचे पदाधिकारी अमोल सोनसरे सह नगरपरिषदेला पोहोचले व प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणाविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली व या त्रासदायक धोरणाचा निषेध केला.यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले उपस्थित नसल्याने उपमुख्यिधिकारी रत्नमाला फटिंग यांच्याशी संपर्क करून अनुमती थांबविण्याचे कारण विचारले असता कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे सांगितले.

यावरून इतर मंडळांना काही कागदपत्रां अभावी अनुमती कशी प्रदान केली व फक्त गजानन सोसायटीच्या मंडळाला अनुमती न देण्याचे कारण काय यावरून विवाद झाला.हर्षल काकडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिका॒र्यान वर मनमानी कार्य करणे,विनाकारण परवानगी थांबवण्याचा आरोप लावला.व त्यांच्या हरकती ची तक्रार वरिष्ठ अधिकारी व मंत्रालया पर्यंत करण्याचे मतही व्यक्त केले. उपस्थित उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग ने शिष्टमंडळाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला व काही प्रमाणपत्र आवेदनात कमी असल्याचे सांगून मंडळाला त्याची पुर्तता करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पूर्तता झाल्यावर अनुमती दिली जाणार असल्याचे मत व्यक्त केले. शेवटी मंडळा द्वारा सर्व आवश्यक अनापत्ती प्रमाणपत्राची पूर्तता होताच मंडळाला प्रतिमा स्थापनेची अनुमती नियम व शर्ती अनुसार प्रदान करण्यात आली.ज्यामुळे विवादावर पडदा पडला.