Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पोहेच्या तर्रीवरून वाद; भरतवाड्यात तरुणाची निर्घृण हत्या!

अल्पवयीनासह एकाच कुटुंबातील 7 जण गजाआड;
Advertisement

नागपूर : पोहेच्या तर्रीचे काही शिंतोडे अंगावर उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद अखेर एका तरुणाच्या जीवावर बेतला. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत भरतवाडा परिसरात भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 27 वर्षीय योगेश शाहू याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह सात जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी योगेश शाहू हा त्याचे मित्र राजा शाहू आणि रोहित यांच्यासोबत भरतवाड्यातील एका नाश्ता केंद्रावर गेला होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर पोहेच्या तर्रीचे शिंतोडे उडाल्याने वादाला सुरुवात झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

योगेशने हा वाद पोलीस ठाण्यात नेण्याची भूमिका घेताच संबंधित अल्पवयीन मुलगा तेथून निघून गेला. मात्र काही वेळातच त्याने आपल्या परिचितांना बोलावून घेतले. त्यानंतर प्रफुल बांते घटनास्थळी पोहोचला आणि पुन्हा वाद पेटला. गोंधळ ऐकून जवळच राहणारे पिलारे कुटुंबही या भांडणात सहभागी झाले.

आरोपानुसार, सलिता पिलारे आणि शिवानी पिलारे यांनी योगेशला मारहाण केली, तर राजेश पिलारे हा घरातून लाकडी बल्ली घेऊन आला. काही वेळातच शुभम पिलारेलाही घटनास्थळी बोलावण्यात आले. दरम्यान, योगेशचा मोठा भाऊ लोकेश शाहू मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला.

Advertisement

हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी योगेश जवळील एका कबाड दुकानात लपला. मात्र संतापलेल्या शुभम पिलारेने त्याचा पाठलाग करत दुकानात घुसून चाकूने सपासप वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या योगेशचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.

भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्येमुळे भरतवाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच कलमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

या प्रकरणी राजेश पिलारे, सलिता पिलारे, शुभम पिलारे, शिवानी पिलारे, प्रफुल बांते, शुभांगी बांते आणि एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कलमना पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.