Published On : Thu, Apr 5th, 2018

सुनील केदार यांच्या विरोधातील याचिका खारीज


नागपूर : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरुद्ध दाखल केलेली निवडणूक याचिका नागपूर खंडपीठाने खारीज केली. १५ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूचा युक्तिवाद समाप्त झाल्यानंतर न्या. विनय देशपांडे यांनी (क्लोज फॉर आॅर्डर) निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने याचिका खारीज केली. अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी सोनबा मुसळे यांना लोकप्रतिनिधित्व अपात्र कायदा कलम ९ (अ) लागू होत नाही, असे हायकोटार्ला सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुसळे यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. यानंतर माळेगाव येथील मनीष मोहोड यांनी मुसळे हे शासकीय कंत्राटदार असल्यामुळे ते लोकप्रतिनिधी कायदा -१९५१ मधील कलम ९-अ नुसार विधानसभेची निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची तक्रार नोंदविली होती. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मुसळे यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९-अ मधील तरतुदी लागू होत असल्याचा निष्कर्ष नोंदवून नामनिर्देशनपत्र नामंजूर केले. याविरुद्ध मुसळे यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले होते. मुसळे यांच्यातर्फे अ‍ॅड़ फिरदोस मिर्झा, अ‍ॅड़ आनंद देशपांडे यांनी बाजू मांडली़

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement