मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात CBIने FIR नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. या FIRमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असले, तरी त्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. FIRमध्ये आरोपी म्हणून ‘अज्ञात व्यक्ती’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या आधारे CBIने ही FIR दाखल केली आहे. दरम्यान, दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या जबाबात आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पंचोली, दिनो मोरिया यांच्यासह काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मात्र, केवळ जबाबात नाव आल्याने संबंधित व्यक्ती आरोपी ठरत नाही. CBIकडून या आरोपांची आणि संबंधित व्यक्तींच्या संभाव्य भूमिकेची तपासणी केली जाणार आहे. तपासात ठोस पुरावे आढळल्यासच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे CBIच्या तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.



