नागपूर : विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मतदारांना जागृत करण्याच्यादृष्टीने स्वीप (swip) कार्यक्रमाला गती आली आहे.
याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली. यावेळी दिपेन अग्रवाल, कैलाश जोगानी, अश्विन मेहाडिया, श्रावणकुमार मालू, तेजिंद्रर सिंग रेणू, रामअवतार तोहा, स्वप्नील अहिरकर, नितीन बंसल, तरुण आनंद निर्बाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
काल मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच अभियंत्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात सामूहीक आवाहन करण्यात आले होते. आजही नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशन या वाणिज्य संघटनांशी जिल्हाधिकारी रविं