Published On : Wed, Oct 16th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात डी. लक्ष्मीनारायण दिवस साजरा

रामटेक : विद्यासागर कला महाविद्यालयात डी .लक्ष्मीनारायण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपली शेकडो एकर जमीन व संपप्ती दान करणाऱ्या दानविर समाजसेवक डी. लक्ष्मीनारायण यांचा दिवस विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात साजरा करण्यात येतो. विद्यासागर कला महाविद्यालयात या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश महल्ले यांनी डी. लक्ष्मीनारायण यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ.सावन धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गिरीश सपाटे यांनी अध्यक्षपद भूषविले.

या प्रसंगी डॉ. सुरेश सोमकुवर, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. आशिष ठाणेकर तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.