Published On : Thu, Nov 16th, 2017

मिहानमधील अतिक्रमणधारकांना म्हाडामार्फत घरे देण्याचे पालकमंत्र्यांचे मिहानला निर्देश

MHADA
नागपूर: मिहान प्रकल्पातील ग्रामीण व शहरात 2001 पूर्वीच्या वास्तव्य असलेल्या अतिक्रमणधारकांना मिहानकडून म्हाडामार्फत घरकुल देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मिहानला दिले.

मुंबई येथे मिहानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीत पालकमंत्र्यांनी हे निर्देश दिले. गावठाणाचे बाहेर या कुटूंबांनी मिहानच्या ग्रामीण व शहरी भागात शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. सन 2001 पूर्वीपासून ही कुटूंबे तेथे राहात आहे. प्रत्येकी 250 घरांची योजना ग्रामीण व शहरी भागासाठी करुन या कुटूंबांना या योजनेत सामील करुन घेण्यात यावे. खापरी गावाच्या पूनर्वसनाचा कालबध्द कार्यक्रम आखून प्रकल्पग्रस्तांना लवकर भूखंड मिळावे अशा पध्दतीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मिहानचे प्रकल्पग्रस्त कुटूंबातील तरुणांच्या रोजगारासाठी महानिर्मितीने तयार केलेली योजना राबवण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. मिहान मधील कंपन्या कौशल्य विकसित झालेल्या बेरोजगारांची मागणी करतात. प्रकल्पग्रस्तांना कौशल्यासह प्रशिक्षण मिहानने द्यावे व मिहानमधील कंपन्यांना लागणारे कौशल्य विकसित करून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन मिहानमध्ये गेली, अशा तरुणांना विद्यावेतनासह रोजगार उपलब्ध होईल. प्रकल्पग्रस्तांसाठी विद्यावेतन योजनेत या बेरोजगारांना समाविष्ट करुन द्यावे.

Advertisement

चिचभवन येथे नागरी सुविधा सहा महिन्यात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. खापरी, कलकुही, तेल्हारा येथील धार्मिक स्थळे मिहानमध्ये गेली. त्या धार्मिक स्थळांसाठी भूखंड उपलब्ध करुन द्या. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी कोराडी येथे केलेल्या महानिर्मितीच्या रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय बांधून एका संस्थेला चालविण्यास द्या. मिहानमध्ये दोन तलाव आहेत. या तलावांवर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या सोसायटयांना मासेमारी करण्यास परवानगी देण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, मिहानचे एमएडीसी अंतर्गत मिहानचे व्यवस्थापकीय संचालक काकाणी, व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement