Published On : Fri, Apr 14th, 2017

दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Advertisement

* दीक्षाभूमीला प्रधान मंत्री यांची भेट
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली


नागपूर
: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना निश्चितच प्रेरणा देत राहील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कृपाल तुमाने यावेळी उपस्थित होते.

प्रधान मंत्री श्री. मोदी यांचे 10.45 वाजता दीक्षाभूमी येथे आगमन झाले. विश्वस्त विलास गजघाटे यांनी त्यांचे स्वागत करुन माहिती दिली. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करुन अभिवादन केले व परिक्रमा केली. भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केल्यानंतर मोदी यांनी स्तूपात योगसाधना केली. यानंतर दीक्षाभूमी स्वागत समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई व सदानंद फुलझेले यांनी प्रधान मंत्री यांचे स्वागत केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्तूपाची पाहणी केली. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन अभिवादन केले.

“दीक्षाभूमी येथे आज डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे सौभाग्य आपणास प्राप्त झाले. यामुळे अत्यंत प्रसन्नतेची अनुभूती होत आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही दीक्षाभूमी निश्चितच कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील”. अशा भावना प्रधान मंत्री यांनी यावेळी नोंदविल्या. दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Gold Rate
20 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,47,200/-
Gold 22 KT ₹ 1,36,900 /-
Silver/Kg ₹ 3,10,400 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement