Published On : Mon, Oct 11th, 2021

दिघोरीत ‘महापौर नेत्र ज्योती शिबिर’

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने दिघोरी येथे नगरसेवक विजय झळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात महापौर नेत्र ज्योती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक विजय झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, गजेंद्र मोहाडीकर, कीर्ती शेंडे, मधू राऊत, अर्चना भेंडारकर, अनंता बाविस्कर, शंकर भोयर, दिलीप खोब्रागडे उपस्थित होते. शिबिरात सहभागी नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यासाठी महात्मे नेत्रपेढीच्या चमूने नेत्रतपासणी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना विजय झळके म्हणाले, नागपूर महानगरपालिका मुलभूत सोयी देण्यासोबतच नागरिकांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे, ही आनंददायी बाब आहे. अशा योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिबिरात उपस्थित शेकडो नागरिकांची नेत्रतपासणी करून त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.