Published On : Sat, Jun 30th, 2018

खोदकाम करणाऱ्या कंपन्यांनी मनपाच्या निर्देशाची अंमलबजावणी करावी : संजय बंगाले

Advertisement

नागपूर: शहरात विविध ठिकाणी विविध कंपन्यांकडून खोदकाम सुरू असते. दूरसंचार कंपनी असो वा विद्युत कंपनी. त्यातच महापालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर सीमेंटचे रस्ते बांधकाम सुरू आहे. बांधकाम करत असताना खोदकामादरम्यान पाईपलाईन किंवा केबल लाईन तुटल्याची घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे खोदकाम करणाऱ्या कंपनींनी अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत काम करावे, मनपाच्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.

शहरात खोदकाम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कंपन्याच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, उपनेते बाल्या बोरकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभुळकर, गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना संजय बंगाले म्हणाले, शहरात ज्या ठिकाणी खोदकामे सुरू करत आहेत, त्या ठिकाणच्या झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या झोनचा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्याशी संपर्क साधावा, असे निर्देश त्यांनी दिले. खोदकाम करणाऱ्या सर्व कंपनींच्या प्रतिनिधींचा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचा वॉटस्अप ग्रुप तयार करून एकमेकांत समन्वय साधण्यासाठी परिपत्रक आयुक्तांमार्फत काढण्यात यावे, असे निर्देश सभापती संजय बंगाले यांनी दिले. समन्वयचा अभाव असल्याने अशाप्रकारच्या घटना घडत असतात, त्या यानंतर घडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना सभापती संजय बंगाले यांनी केली. बैठकीला महामेट्रो, एसएनडीएल, एलअण्डटी, जीओ, बीएसएनएल, एनएचएआय, बांधकाम विभाग,एमएसईबी या विभागांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement