Published On : Sat, Nov 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल- पेट्रोल चोर सक्रिय; स्थानिकांकडून तक्रार दाखल

Advertisement

नागपूर : शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आता चोरटयांनी डिझेल -पेट्रोलवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. हुडकेश्वर पिपळा रोडवर रात्रीला डिझेल पेट्रोल चोरीच्या घटना समोर येत आहे.

डिझेल चोरांकडून चोरी केली जात असताना सीसीटीव्हीमध्ये ते कैदही झाले आहे. सीसीटीव्हीतील छायाचित्रानुसार दोन युवक दुचाकीवर येऊन ट्रकच्या डिझेलची टाकी फोडून चोरी करतांना दिसत आहे. या चोरट्यांनी डिझेलची चोरी केल्यानंतर हुडकेश्वर परिसरातून दुचाकीने जात असल्याचेही दिसत आहे.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील १०-१५ दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. . स्थानिक लोकांनी यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याला सूचनाही दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी डिझेल -पेट्रोलची चोरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांची नियमित पेट्रोलिंग व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement