नागपूर : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा, आणि नोकरदारांना आनंदाचा सुखद धक्का देणारा यंदाचा अर्थसंकल्प ठरला आहे.
अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादने आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसेच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये तशी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यव्यवस्थेकडे विशेष भर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेषताः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत. दरम्यान, या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून कर्जाची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटी करण्यात आली आहे. गॅरंटी फि सुद्धा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केला आहे.
काय स्वस्त?
-चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार
-इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील.
-मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
-इलेक्ट्रिक कार स्वस्त होईल. कपड्याच्या वस्तू स्वस्त होतील.
-एलईडी टीव्हीही स्वस्त होईल. कर्करोगावरील तब्बल ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत. तर अनेक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवली जाईल. फ्रोझन फिश पेस्टवरील
-कस्टम ड्युटी १५ वरून ५ विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील.- सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्के करण्यात आली.
– कोबाल्ट, लिथियम, आयन बॅटरी कचरा आणि जस्त वरील प्राथमिक आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे.
– स्मार्टफोन आणि स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली. यामुळे देशातील स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनच्या एकूण किमती कमी होतील.
– कॅरिअर ग्रेड इथरनेट स्विचेस स्वस्त होणार आहेत. पुढील १० वर्षांसाठी जहाजे बांधण्यासाठी कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्कातून सूट.
काय महागलं?
– फ्लॅट पॅनेल डिस्प्ले महाग होणार आहेत.
– सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्मार्टफोन्स निर्मितीसाठी लागणारे घटक स्वस्त झाले आहेत. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या या वस्तू स्वस्त होतील. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. म्हणजे आता भारतात तयार होणार आयफोन स्वस्त होऊ शकतो.