Published On : Wed, Feb 5th, 2020

पिपरी गाडेघाट रेती घाटावर धाड ५३ लाख ३९ हजार रू.चा मुद्देमाल जप्त

जेसीबी,दोन दहाचाकी,एक सहा चाकी,ट्रक्टरट्रालीत,१३ ब्रॉसरेती जप्त

कन्हान : – नदीच्या पिपरी गाडेघाट रेती घाटावर तहसीलदारांनी मध्यरात्री धाड टाकुन अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून चोरी करताना एक जेसीबी,दोन दहा चाकी, एक सहाचाकी ट्रक, एक ट्रक्टर ट्राली मध्ये १३ ब्रॉस रेती चोरून नेताना पकडुन ५३ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपीना अटक केली असुन मुख्य आरोपी पसार झाले.

परिसरातील कन्हान नदीचे रेती घाट बंद असताना मोठया प्रमाणात रेती चोरी चा गोरखधंदा सुरू असल्याने शासना च्या महसुलाची मोठया प्रमाणात नुकसा न होत असल्याच्या तक्रारी वाढु लागल्या ने पक्की गुप्त माहिती पारशिवनीचे तहसीलदार वरूण कुमार सहारे हयाना मिळाल्याने दि.०४ मंगळवारच्या मध्य रात्री २ वाजता दरम्यान पिपरी गाडेघाट रेती घाटावर छापामार कार्यवाही केली असता एक जेसीबी क्र.एम एच ३१ एफ ए – ८७३४ किंमत १५ लाख, दोन दहा चाकी ट्रक

१) क्र.एम एच ४० बी जी – १६१८ किंमत १२ लाख,२) एम एच ४० बी जी – ५७७६ किंमत १२ लाख, एक सहाचाकी ट्रक क्र एम एच ४० वाय – ५०९१ किंमत ०८ लाख, एक ट्रक्टर क्र एम एच ४० एल- ७३७९, ट्राली क्र एम एच ४० ए एम ०५९६ किंमत ०६ लाख रू एकुण वाहनाची किंमत ५३ लाख आणि दोन दहाचाकी ट्रक मध्ये १० ब्रॉस रेती कि.३० हजार, सहाचाकी ट्रक मध्ये ०२ ब्रॉस रेती कि.०६ हजार, ट्रक्टर ट्राली मध्ये ०१ ब्रॉस रेती किंं.०३ हजार अशी १३ ब्रॉस रेती किंमत ३९ हजार रू अशा एकुण ५३,३९०००(तेरेप्पन लाख एकोण चाळीस हजार रूपयाचा) मुद्देमाल कन्हा न पोलीस स्टेशनला जप्त करून आरोपी १) राजेद्र पुरणसिंग चौव्हाण वय ३० वर्ष रा. कन्हान २) भिमराव मारोती वंजारी वय ५२ वर्ष रा. नंदनवन नागपुर ३) शेख इरफान शेख रज्जाक वय २५ वर्ष रा. शिवनी ४) शुभम रमेश ईनवाते वय २० वर्ष रा. शिवनी ५) विशाल राजेंद्र पिल्ले वय ३४ वर्ष रा. कामठी या पाच आरोपी ना कलम ३७९, ३४, १०९ भादंवि अन्वये अटक करण्यात आली असुन घटना स्थळावरून पसार झालेल्या मुख्य आरो पीचा शोध सुरू आहे.

या कार्यवाहीत पारशिवनीचे तहसीलदार वरूणकुमार सहारे व सहकारी, कन्हान थानेदार चंद्र कांत काळे, पी एस आय शेख, शरद गिते , नझीर कुरेशी, संजय भदोरिया, राहुल रंगारी, प्रकाश वर्मा, विरेंद्र यादव आदीने सक्रिय सहभाग घेतला. ही मोठी कार्य वाही केल्याबाबत तहसीलदार व सर्व सहकार्याचे नागरिकानी कोतुक करून अश्याच वारंवार कार्यवाही करून शास नाच्या महसुल चोरीस आळा बसवण्या ची मागणी होत आहे.