Published On : Wed, Jan 16th, 2019

धावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनच्या इव्हेंटला उत्साहात सुरुवात

Advertisement

नागपूर : महा मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत लवकरच प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी सुरु झाली असून शहरभर याबाबत उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. पंधरवड्याआधी महा मेट्रो नागपूरद्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘धावणार माझी मेट्रो ऑनलाईन कॅम्पेन’ आणि ‘विश वॉल कॅम्पेनला’ नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा.केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी ह्यांनी विश वॉलवर शुभेच्छा लिहून या कॅम्पेनचा श्रीगणेशा केला होता.

त्याचप्रमाणे आयएएस, आयपीएस, डीसीपी अधिकाऱ्यांनी देखील विशवॉलवर लिहून शुभेच्छा देत कॅम्पेनचे कौतुक केले. हल्लीच नागपूरला झालेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ महानाट्याचे अभिनेते महाराष्ट्राचे लाडके कलाकार अमोल कोल्हे ह्यांनीही कॅम्पेनला भरभरून शुभेच्छा दिल्या. याव्यतिरिक्त स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा, कॉलेजमध्ये देखील या कॅम्पेनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागपूर मेट्रोत प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी नागरिकही या कॅम्पेनमध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊ लागले आहेत.

या कॅम्पेनने आता दुसरा टप्पा गाठला असून कालपासून म्हणजे दि. १५ जानेवारीपासून ‘धावणार माझी मेट्रो इव्हेंट्स’ ची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन महामेट्रोद्वारा करण्यात आले. झिरो माईल येथे स्थित नागपूर मेट्रो माहिती केंद्रात ‘लास्टबेंचर्स’ क्लबच्या युवकांसाठी सांस्कृतिक आणि माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या युवकांनी येथे मेट्रोबद्दलची माहिती जाणून घेतल्यानंतर माझी मेट्रोसाठी लिहिलेल्या काही कवितांचे अभिवाचन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

याशिवाय १६ जानेवारी बुधवार रोजी वाल्मिकी नगर हिंदी उच्च प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि क्वीज कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आली. यावेळी प्रचंड उत्साहात सामील झालेल्या विद्यार्थ्यांना हसत खेळत मेट्रोबद्दलची माहिती प्रदान करण्यात आली. तसेच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

याशिवाय शहरातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती पोचावी म्हणून महामेट्रोची जनसंपर्क चमू स्थानिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था अश्या सर्वांसोबत संवाद साधून सुरु होणाऱ्या प्रवासी वाहतूक संदर्भात अभिप्राय जाणून घेत आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाबद्दलची माहिती प्रसारित करण्यासाठी स्क्रीन असलेले इलेक्ट्रॉनिक व्हेईकल देखील शहरामध्ये फिरविले जात आहे.

महा मेट्रोने खापरी ते मुंजे चौक आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर पर्यंत प्रवासी वाहतूक सेवा लवकरच सुरु करण्याचा मानस नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा आहे. तसेच प्रस्तावित मार्गावरील मेट्रो लाईनला एक आगळी थीम देण्यात आली आहे. वर्धा रोड मार्गावरील खापरी ते आटोमोटीव्ह चौक मेट्रो लाईनला ऑरेंज थीम तसेच लोकमान्य नगर ते प्रजापती नगर या मेट्रो लाईनला एक्वा थीम देण्याचा मानस आहे, तसेच यासंदर्भात महा मेट्रो द्वारे या प्रस्तावित मेट्रो मार्गावरील व परिसरातील नागरिकांनकडून या संदर्भात सूचना,अभिप्राय घेऊन सर्व सहमतीने शिव्कामोर्बत केल्या जाईल.

धावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनला नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि जेष्ठ नागरिक उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत. महा मेट्रो तर्फे राबविण्यात आलेले धावणार माझी मेट्रो’ कॅम्पेन आमच्या परिसरात करण्यात यावे अशी इच्छा नागरिक महा मेट्रोकडे व्यक्त करू लागले आहे.

सगळ्यांनीच आपल्या शुभेच्छा http://wishwall.metrorailnagpur.com/ या लिंकवर नोंदवायला हव्या असे आवाहन नागपूर मेट्रोने केले आहे. तसेच महा मेट्रोद्वारे लोकप्रतिनिधींबरोबर धावणार माझी मेट्रो संवाद, महाविद्यालय- शाळा संवाद, उद्यान कार्यक्रम, महिला-बालक-वृद्ध विशेष कार्यक्रम अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.