Published On : Wed, Jan 8th, 2020

धावत्या रेल्वेत तरुणीची छेड

लष्करी जवानाला मारहाण ,कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये प्रचंड खळबळ ,एकमेकाविरूध्द गुन्हा

नागपूर: धावत्या रेल्वेत एका तरूणीची छेड काढल्यावरून संतापलेल्या सहकाèयांनी लष्करी जवानाला मारहाण केली. त्यांचे सामान आणि मोबाईल फेकले. ही घटना कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळउडाली आहे. या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून एकमेकांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

ठाण्यातील काही तरुण-तरुणी आसामला पिकनिकसाठी गेले होते. परतीचा प्रवास २२५१२ कामाख्य कर्मभूमी एक्स्प्रेसने करीत होते. जवळपास १५ लोक बी-२ बोगीत होते. तर लष्करी जवान मंगेश चौके (रा. चिमुर) आणि अतूल मोहीते (रा. भुसावळ) हे दोघे सशस्त्र सीमा बल आसाम येथे ड्यूवर आहेत. सुटी मिळाल्याने ते घरी जात होते. मंगेश एस-७ डब्यातील ४७ क्रमांकाच्या बर्थवर तर अतूल बी-३ डब्यात बर्थ २१ वरुन प्रवास करीत होते.
५ जानेवारीच्या रात्री अतूल हा मंगेश जवळ जेवन करायला गेला. जेवन झाल्यानंतर दोघेही बी-३ डब्याकडे जाण्यास निघाले. बी-२ डब्यातून जात असताना गाडी हलत होती. याच वेळी त्यांचा धक्का एका तरुणीला लागला. यावरून काही वेळ शाब्दीक वाद झाला. नंतर दोन्ही गटातील लोक शांत झाले. दुसèया दिवशी ६ जानेवारीला दुपारच्या सुमारास तरुणी ही वॉशरुमला गेली असता लष्करी जवानांनी तिची छेड काढली. तरुणीने आरडा ओरड केली. सात लोक धावले. त्यांनी लष्करी जवानांना धावत्या रेल्वेत प्रचंड मारहाण केली. तसेच त्यांचे सामान धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. त्यांचा मोबाईलही फेकला. त्या दोघांना डब्यातच बसून ठेवले. वर्धा ते पुलगाव दरम्यान गाडी थांबली असता दोघेही उतरले आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसने वर्धा स्थानकावर गेले. लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून त्यांनी मारहाण करणाèया विरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार एका तरुणाला धक्का लागल्यावरून हे भांडण झाले होते. त्यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी सात लोकांविरूध्द मारहाण, जीवे मारण्याची धमकी, सामान फेकने याप्रकरणी गुन्हा नोंदविला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांनी या गाडीतील सात लोकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले. भुसावळला गाडी थांबली असता पोलिसांनी त्यासातही लोकांना ताब्यात घेतले आणि वर्धा स्थानकावर आनले. यातील एका तरुणीने दोन्ही लष्करी जवानांनी छेड काढल्याची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी लष्करी जवानांविरूध्द गुन्हा नोंदविला. एकमेकांच्या तक्रारीवरून दोघांनाविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.