Published On : Wed, Feb 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; ‘या’ मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर

Advertisement

नागपूर :सरकार व वीज कंपन्यांच्या विरोधात नागपुरातील कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे कंत्राटी म्हणूनच सेवा देत आहेत. त्यापैकी सुमारे ४ हजार कंत्राटी कर्मचारी नागपुरात कार्यरत आहे.या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन झाले. परंतु,त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. याविरोधात आक्रमक पवित्रा घेत या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान, राज्यातील २५ हून जास्त कामगार संघटनांनी ३ फेब्रुवारीलाच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माहेरघर असलेल्या नागपूर शहरात एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुरार आता आंदोलन सुरू झाले आहे. पुढच्या टप्यात २८ आणि २९ फेब्रुवारीला राज्यभरात ४८ तास कामबंद केले जाईल. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत कामबंद करणार असल्याचे संयुक्त कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement