नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० वर्षीय वृद्धाकडून परिचयातील कुटुंबातील एका १० वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. सुखराम उर्फ बाबू श्याम भोई (७०) असे आरोपीचे नाव आहे.
सुखराम यांची ओळख धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबाशी झाली. कुटूंबातील १० वर्षीय चिमुकली अनेकदा त्याच्याशी खेळायची.तो तिला अनेकदा खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जायचा. तो दोन दिवसांअगोदर तिला घरी घेऊन गेला व तिच्याशी अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला.
मुलीने पालकांना हा घडलेला प्रकार सांगितला. तो परिसरातील इतर मुलींकडे पाहून देखील नेहमीच अश्लील इशारे करायचा. अखेर पालकांनी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार केली. पोलिसांनी सुखरामविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.