
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या शिष्टमंडळाची केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दिल्लीतील कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीनंतर CJP ने सरकारकडून दोन प्रमुख मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ मागितल्याचे संघटनेने सांगितले.
सुमारे ५० मिनिटे चाललेल्या बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, नीट पेपरफुटीमुळे मानसिक तणावात गेलेल्या आणि जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे बैठकीत दिसून आले.
याशिवाय जंतर-मंतरवरील आंदोलन आणि ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे व इतर कायदेशीर कारवाया मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिल्याचा दावा CJP ने केला आहे.
बैठकीत CJP नेत्यांनी आपल्या प्रमुख मागण्या सरकारसमोर ठामपणे मांडल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा झाली. CJP च्या म्हणण्यानुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. उद्या दुपारपर्यंत याबाबत भूमिका स्पष्ट केली जाऊ शकते.
दरम्यान, जोपर्यंत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका CJP ने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction...
बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews #Crime...
नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate
PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi...
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtra #vidarbha




