Published On : Sat, Apr 3rd, 2021

धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन लवकरच प्रवासी सेवेत

Advertisement

– स्टेशन येथून होणार निसर्गाचे दर्शन

नागपूर – महा मेट्रोने अंबाझरी तलावाच्या लगतसुंदर असे धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे निर्माण केले असून केले आहे. स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून अंबाझरी तलावाचे विहंगम दृश्य प्रवाश्याना बघायला मिळेल. महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशनचे निर्माण कार्य जलद गतीने पूर्ण करीत ऍक्वा लाईन मार्गिकेवरील आणखी एका मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले असून सदर मेट्रो स्टेशन लवकरच प्रवासी सेवा करिता सुरु होणार आहे. धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनला नुकतीच सीएमआरएस ने परवानगी प्रवासी वाहतुकी करिता परवानगी दिली आहे.

या मार्गिकेवरील अन्य मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य या आधीच पूर्ण झाले असून त्या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक सुरु आहे, धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याना, नागरिकांना याचा फायदा होणार. मुख्य म्हणजे या स्टेशनच्या जवळूनच एक मार्ग अमरावती महामार्गाला जोडतो त्यामुळे स्थानिक रहिवाश्याना याचा फायदा होईल.

ऍक्वा लाईन मार्गिकेवर सतत रहदारी असते व मोठ्या प्रमाणात एमआयडीसी परिसरात कामाकरता येणे जाणे करतात. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या शाळा,कॉलेज येथील विद्यार्थ्याना करिता देखील उपयुक्त ठरेल. स्टेशन लगतच्या परिसरात अनेक प्रतिष्ठित शासकीय व निमशासकीय कार्यालय,आय टी पार्क, मंदिर, हॉल असल्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच रहदारी असते सदर मेट्रो स्टेशन सुरु झाल्यावर प्रवाश्याना तसेच स्थानिक नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.स्टेशनचे निर्माण कार्य अंबाझरी तलाव आणि भौगोलिक क्षेत्राच्या उपयोगिताला विशेष लक्ष देऊन मेट्रो प्रशासनाने स्टेशनचे डिजाईन तयार केले आहे. या मेट्रो स्टेशनच्या पुढे एल.ए.डी. चौक मेट्रो स्टेशन व मागे सुभाष नगर मेट्रो स्टेशन आहे.

ऍक्वा लाईन मार्गिकेवर प्रवासी वाहतुकीकरिता सुरु असलेले मेट्रो स्टेशन : लोकमान्य नगर, बंसी नगर, वासुदेव नगर, रचना रिंग रोड जंक्शन, सुभाष नगर, एल.ए.डी. चौक, सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, झासी राणी चौक, सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन

धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन: धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनची उभारणी ५४२७. ३ वर्ग मीटर क्षेत्रात करण्यात आली असून, स्टेशनच्या दोन्ही बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था (तलावाच्या बाजूने व रस्त्याच्या पलीकडे फूट ओवर ब्रिजच्या साह्याने प्रवेश) करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

मेट्रो स्टेशनची वैशिष्ट्ये: आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंट मध्ये अग्निशामक टॅंक, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था,कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा,संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत असणार आहे.