Published On : Mon, Nov 23rd, 2020

मोहगाव येथे वर्षा वासात धम्म संस्कार शिबिर

Advertisement

बेला: जवळच्या मोहगाव ( आष्टा) येथील महिला पंचशील बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेपासून वर्षा वासाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्त शिबिर घेऊन भन्ते प्रज्ञाशील श्रामनेर यांनी उपासकांना बुद्धधम्माचे मौलिक संस्काराचे उपदेश दिले. दिवाळीचे पांडव पंचमीला वर्षावास व शिबिराची थाटात समाप्ती करण्यात आली.

याप्रसंगी बनते प्रज्ञाशील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञा, महा मंगलसूत्र, जय मंगलाष्ट गाथा, परित्राण पाठ व अन्य मौलिक विषयाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाराव कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नागपूर खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष वसंतराव कांबळे यांनी मानले.

वर्षावास व शिबिरा प्रसंगी उपसरपंच अनिता कांबळे, मारुती शंभरकर ,निळकंठ गोडघाटे, चंद्रमणी पोहनकर, कार्तिक कांबळे ,गौतम धनविजय, शेषराव वानखेडे,,सुजाता वानखेडे, शालिनी गोडघाटे, सत्यभामा देठे, उर्मिला पोहनकर, लिलाबाई धन वीज ,,शोभा वाबळे ,उषा कांबळे ,इंदू शंभरकर व अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते

Advertisement