Published On : Thu, Mar 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रामनवमीनिमित्त पोद्दारेश्वर राम मंदिरात भक्तांचा जनसागर; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा

Advertisement

नागपूर : रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात पहाटेपासूनच भक्तांचा जनसागर उसळला आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत असून सकाळपासूनच लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत.

मंदिरात पहाटे काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, पूजन व विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. श्रीराम जन्माचा सोहळा दुपारी ठरलेल्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यासाठी मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आला आहे.

रामनामाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय मदतीसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून पोद्दारेश्वर राम मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र ठरत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.