Published On : Mon, Jan 1st, 2024

नवीन वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना- देवेंद्र फडणवीसांच्या खोचक शुभेच्छा

Advertisement

नागपूर: नवीन वर्षानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टार्गेट करत खोचक शुभेच्छा दिल्या आहेत.नवीन वर्ष सर्वांनाच सुख समाधानाचे जावो.

Advertisement

खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा आहे, त्याच अपेक्षा आमच्यादेखील असतात. नवीन वर्षात ज्या काही लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहे, त्या पूर्ण करता याव्या एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसंच नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांना सुद्धा सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे फडणवीस म्हणाले. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.

देशभरात मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळीही जनतेला व एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मात्र, यावेळी एकमेकांवर नेतेमंडळी राजकीय टोलेबाजी करताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक टोलेबाजी सुरु आहे.

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला.देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.