नागपूरः आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यानंतर फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या निवडणुका आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे तयार झालेले वातावरण या अनुषंगाने फडणवीसांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
नागपूरकरांच्या मानत भाजपाविरोधात भावना निर्माण होत असल्याचे लक्षात येताच फडणवीसांनी विशिष्ट प्रकारचा नागपूर दौरा आखला आहे. त्यामध्ये ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यात ते भाजपचा प्रचार करणार आहेत. या दौऱ्यामध्ये आपण शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघात जावून त्याठिकाणचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान भाजप आमदारांना मंत्रिपदाचे आमिष देऊन त्यांना पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला.यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. भाजपमध्ये मंत्री बनायला पैसे लागत नाहीत. अशा लोकांना आम्ही ट्रॅप केले असल्याचे फडणवीस म्हणाले.