Published On : Wed, Jul 8th, 2020

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला.

ही घटना आज (बुधवारी) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली.

सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.