Published On : Wed, Jun 24th, 2020

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

सोलापूर : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशी जहरी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. “शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे,” असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Advertisement

राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक
दरम्यान, गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने उद्या (गुरुवारी सकाळी 10 वाजता) आंदोलनाची हाक दिली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे. “गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.

Advertisement

पडळकर काय म्हणाले?
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement