नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयाच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण रविवारी (ता.२९) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी (ता.२४) घेतला. नवनिर्मित इमारतीची पाहणीही केली.
यावेळी त्यांच्यासमवेत सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन, नगरसेविका अभिरूची राजगिरे, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, विद्युत विभागाचे मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सतरंजीपुरा झोन कार्यालयाची नवीन इमारत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आहे. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचाना महापौरांनी यावेळी केल्या. प्रत्येक विभागाची रचना ही व्यवस्थितरित्या आखली जावी, अधिकाऱ्यांच्या आणि विभागांच्या नावाचे फलकही लावण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पार पाडण्यात यावी, अशा सूचना देखिल यावेळी महापौरांनी केल्या.











