नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मान्यता दिल्याची माहिती भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील.
भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.या प्रस्तावाला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मित्रपक्ष शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही मान्यता मिळाली, असे भाजपमधील दोन उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
भाजप नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी मान्यता दिली.
महायुतीतील अन्य सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे उपमुख्यमंत्री पद असेल.मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची आशा असलेल्या शिंदे यांना पवारांसह उपमुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
भाजप २१ मंत्रीपदे स्वतःकडे ठेवणार –
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद कायम राहील, असा विश्वास आहे. मात्र त्यांना अजित पवारांसह उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला सुमारे १२ मंत्रीपदे मिळतील. त्यांना काही महत्त्वाची खाती दिली जातील. राष्ट्रवादीलाही सुमारे १० मंत्रिपदे मिळतील. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातची कमाल मर्यादा ४३ आहे. १३२ आमदार असलेल्या भाजप २१ मंत्रीपदे स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.
यामध्ये गृह, वित्त, नागरी विकास आणि महसूल ही चार प्रमुख खाती भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मात्र मंत्रीपद आणि खात्यांच्या संख्येवर काही शेवटच्या क्षणी वाटाघाटी अजूनही सुरू राहणार आहेत.