
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केले. सपकाळ यांनी फडणवीस दिवसरात्र पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहतात, असा टोला लगावला होता.
फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर २०१४ ते २०१९ दरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मुंबई मेट्रो, जलसंधारण प्रकल्प, शेतकरी कल्याण योजना असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले गेले. २०२४ च्या निवडणुकीनंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असून, केंद्रातील भाजप नेतृत्वाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही फडणवीस यांची ओळख आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र स्पष्ट केले की, “अंतिम निर्णय हा पक्षाचाच असेल.”
दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. विरोधक याला फडणवीस यांच्या ‘महत्त्वाकांक्षा’शी जोडत आहेत, तर राजकीय जाणकारांच्या मते त्यांच्या कार्यशैलीमुळे ते भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.










