नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. यावेळी ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’च्या (GBS) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत, यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी.
या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्यामुळे होतो.
त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे,असे फडणवीस म्हणाले.