Published On : Fri, Oct 13th, 2017

अंबाझरी राखीव जंगलातील जैव विविधता उधानाचा विकास जलद गतीने करा-प्रवीण परदेशी

Advertisement

नागपूर: अंबाझरी राखीव जंगल येथील जैव विविधता उधानात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि उर्वरित सर्व विकास कामे जलद करा असे निर्देश मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनी वन अधिकारी यांना दिले.यावेळी वन समितीच्या सदस्य व नगरसेविका डॉ.परिणीता फुके,ना.सु.प्र.चे सभापती दीपक म्हैसेकर,मुख्य वन संरक्षक संजीव गौर,उपवनसंरक्षक मालिकार्जून,सहाय्यक वनसंरक्षक उमाळे,वन परिक्षेत्राधिकारी निनावे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिरी,ना.सु.प्र.चे कार्यकारी अभियंता पाटील व अन्य अधिकारी यावेळी उपस्तिथ होते.

यावेळी प्रवीण परदेशी यांनी संपूर्ण जंगलाचे निरीक्षण केले.आता पर्यंत किती झाडे लावलीत,किती छोटे तलाव तयार झालेत,संरक्षण भिंत व अंबाझरी तलावात येणाऱ्या दूषित पाणी याबद्दल सविस्तर माहिती घेतली.अंबाझरी तलावात जे नाल्या द्वारा दुषीत पाणी येते त्यावरती जलशुद्दीकरण प्रक्रिया यंत्र (सिवर ट्रिटमेंट प्लांट) लावण्यात यावे,ज्यामुळे अंबाझरी तलावातून होणारा पिण्याचा पाणी पुरवठा शुद्ध व पिण्या योग्य राहील.या जलशुद्धीकरणाचे काम हे नागपूर सुधार प्रन्यास ने लवकर सुरु करावे असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले व याची अंमलबजावणी १५ दिवसात करून याबद्दल मला सविस्तर माहिती देण्यात यावी.

जंगल व उधान विकासाकरिता त्वरित सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी तसेच येथील विकासाचा प्रस्ताव व आराखडा त्वरित तयार करण्यात यावा.प्रत्येक आठवड्यात वन समितीने या क्षेत्राचा दौरा घेऊन बैठक घ्यावी व त्याची संपूर्ण माहिती मला पाठविण्यात यावी असे निर्देश सुद्धा दिलेत.रोपवाटिका (नर्सरी) चे काम लवकर सुरु करण्यात यावे.

१५ नोव्हेंबर पर्यंत या क्षेत्रातील विकासाची संपूर्ण माहिती तयार करून मला कळविण्यात यावी.या क्षेत्राचा विकास अतिशय जलद गतीने करायचा असल्यामुळे आपण सर्वांनी या जंगलाच्या विकासा कडे वैयक्तिक लक्ष द्यावे.