Published On : Thu, Aug 6th, 2020

नागपूरला “बायसिकल कॅपिटल ऑफ इंडीया” बनविण्याचा ‍निर्धार स्मार्ट सिटी – मनपाचा उपक्रम

Advertisement

नागपूर: नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (६ ऑगस्ट) ला सकाळी ” इंडिया सायकल्स

फॉर चेंज चॅलेंज” उपक्रमां अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश नागपूर शहराच्या नागरिकांना सायकल चालविण्या करीता प्रोत्साहन देणे असून या माध्यमातून नागपूरला “बायसिकल कॅपिटल ऑफ इंडीया” बनविण्याचा निर्धार करण्यात आला. केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी ‍विकास मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री.विजय (पिंटू) झलके, मा. सत्ता पक्षनेता श्री. संदीप जाधव, मा. विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर स्मार्ट सिटी श्री. महेश मोरोणे आणि मोठया प्रमाणात सायकल चालक उपस्थित होते. सगळया प्रमुख पाहुण्यांनी सायकलिंगचा आनंद घेतला.

प्रास्ताविक भाषणात श्री. महेश मोरोणे यांनी कार्यक्रमांची माहिती विषद करतांना सांगितले की, देशभरातील १०० स्मार्ट सिटी पैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमा-अंतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ऑक्टोंबर पर्यंत सुरक्षित सायकल चालविण्या करिता अंतर्भूत बायलेन तयार करणे, सर्वेक्षण करणे आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

ऑक्टोंबर नंतर अकरा शहरांचे दुस-या फेरीसाठी केंद्र शासना मार्फत निवड केली जाईल आणि पारितोषिक म्हणून एक कोटी रुपयांची पुरस्कार देण्यात येईल. सायकलचा वापर केल्यामुळे प्रदुषण कमी करण्यात मदत होते आणि नागरिकांचा शारीरिक व्यायाम देखील होतो. त्यांनी सांगितले की मा. महापौर श्री. संदीप जोशी व मा. मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे आणि स्मार्ट सिटीचे संचालक मंडळाचे मार्गदर्शनात हे कार्य पूर्ण करण्यात येईल. त्यांनी सांगितले की मा. मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या हा “ड्रीम प्रोजेक्ट” आहे आणि यासाठी निधिचे प्रावधान करण्यात आले आहे.

आपल्या संदेशात श्री.विजय झलके म्हणाले की, नागपूर स्मार्ट सिटीनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. सायकलिंगच्या माध्यमातून प्रदुषण कमी होईल आणि नागरिक निरोगी होतील. सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव आणि विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे यांनी सुध्दा नागरिकांना सायकलचा जास्ती-जास्त वापर करुन नागपूरला “बायसिकल कॅपीटल ऑफ इंडीया” बनविण्याचे आवाहन केले.

अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी निरोगी राहणे आवश्यक आहे. सायकलिंगच्या माध्यमातून ते सुदृढ राहू शकतात.

या कार्यक्रमात आम्सटरडॅमच्या बी.वाय.सी.एस. संस्थेच्या बायसिकल मेयर ‍ दीपांती पाल यांनी सुध्दा भाग घेतला. या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, श्री. प्रकाश वराडे, श्री.विजय हुमणे, साधना पाटील, सुषमा मांडगे, किरण बागडे, स्मार्ट सिटी कंपनी सेकेट्रीरी भानुप्रिया ठाकुर, राजेश दुफारे, अर्चना अडसड, प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, सोनाली गेडाम, अनुप लाहोटी, पराग अर्मळ, कुणाल गजभिये, परिमल इनामदार, मुकेश मेहाडिया आदी उपस्थित होते.