Published On : Mon, Jan 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ नागपूर शहर विकसीत करण्याचा निर्धार : डॉ. अभिजीत चौधरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपामध्ये राष्ट्रध्वजवंदन

नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांना सर्व प्राथमिक सुविधा प्रदान करतानाच शहरातील विविध विकास प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहराचा चौफेर विकास होत असताना नागरिकांना सुलभता प्रदान करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न् सुरू आहेत. शहरातील सर्वभागादारकांच्या सहकार्याने नागपूर शहर हे ‘ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ शहर म्हणून विकसीत करण्याचा निर्धार करु, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी केले.

रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, प्रकाश वराडे, मिलींद मेश्राम, गणेश राठोड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, डॉ. अनुश्री चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्तांनी अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारली. अग्निशमन विभागाच्या तीन प्लाटून ने आयुक्तांना मानवंदना दिली. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रचे केंद्र अधिकारी श्री. भगवान बी. वाघ, दुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व लकडगंज अग्निशमन केंद्रचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप पी. चव्हान आणि तिसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व गंजीपेठ अग्निशमन केंद्रचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. प्रकाश एन. कावडकर यांनी केले.

ध्वजवंदन कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच यावेळी क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, शहरातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग, महिला, बालक यांच्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याकरिता अनेक योजना अंमलबात आणण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहराचे महापौर राहिलेल्या मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला १०० दिवसीय सात कलमी कृती कार्यक्रम आखून दिलेला आहे. या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाद्वारे करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी अनेक महत्वाचे कार्य करण्यात येत आहेत. नागपूर शहराची स्वच्छ, सुंदर ही ओळख अधिक प्रभावीपणे जनमानसात जावी याकरिता स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराची कामगिरी उंचावण्याची प्राथमिकता असल्याचेही आयुक्त म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे ‘शिक्षणोत्सव’ सुरु आहे. या महोत्सवामध्ये शिक्षकांकरिता शिक्षणोत्सवाचे लोगो तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मनपाच्या संजय नगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका डॉ. मिनाक्षी भोयर यांच्या लोगोची निवड करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच डॉ. मिनाक्षी भोयर यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात उपायुक्त श्री. अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, विजय थूल, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनपाचे संगीत शिक्षक श्री. प्रकाश कलसिया यांच्यासह श्री. उमेश पवार व कमलाकर मानमोडे यांनी पथसंचालनाला संगीत साथ दिली. श्री. कलसिया यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायले.

कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.

Advertisement