Published On : Thu, Nov 7th, 2019

सराईत गुन्हेगारास सहा महिण्यासाठी हद्दपार

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बकरा कमेला येथील अश्फाक कुरेशी वल्द वहाब कुरेशी यांच्या घरी राहत असलेल्या मोहम्मद उस्मान वल्द मोहम्मद मोहम्मद सुभान वय 31 वर्षे यांच्यावर जुनी कामठी तसेच इतर पोलिस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद असूनही सदर आरोपीचे वर्तन सुधारित नसल्याने त्यास कायद्याचा वचक राहण्याच्या दृष्टीने पुढील 6 महिण्याकरिता नागपूर शहर पोलीस आयुकतालय तसेच नागपूर ग्रामीण हद्दीतील पो स्टे मौदा, खापरखेडा व कन्हान येथुन हद्दपार करण्यात आले असून त्यास रामटेक तहसिल अंतर्गत येणाऱ्या दुधाळा गावातील परिचित व्यक्तीकडे सोडण्यात आले आहे.

सदर कारवाही पोलीस उपायुक्त निलोत्पल , सहाय्यक पोलीस आयुक्त राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक परदेसी, डी बी पथक चे किशोर गांजरे, विजय सिन्हा, रोशन पाटील, पवन गजभिये यांनी पार पाडली .

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement