Published On : Wed, Nov 25th, 2020

भाजपाचा गड नेस्‍तनाबूत करा – ना. अनिल देशमुख

अॅड. वंजारी यांची काटोल व भंडा-यात प्रचार सभा

नागपूर: युवकांना रोजगार देण्‍याच्‍या गप्‍पा मारणा-या भाजपाने पदवीधर मतदारसंघाला इतकी वर्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात ठेवले पण आजही मोठ़या प्रमाणात युवक बेरोजगार फिरत आहेत. प्रत्‍येक क्षेत्रातील पदवीधरांच्‍या उज्‍ज्‍व ल भविष्‍यासाठी, त्‍यांना रोजगाराच्‍या संधी मिळवून देण्‍यासाठी पदवीधरांनो तुम्‍ही तुमची सामूहिक शक्‍ती जागी करा आणि भाजपाचा गड नेस्‍तनाबूत करून महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनाच विजयी करा, असे रोखठोक आवाहन महाराष्‍ट्राचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी केला.

महाराष्‍ट्र विधानपरिषदेच्‍या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस, शिवसेना, पिरिपा ( कवाड़े गट), आरपींआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारार्थ काटोल व भंडारा येथे सभा घेण्‍यात आली.
काटोल येथे झालेल्‍या प्रचार सभेत ना. अनिल देशमुख बोलत होते. सभेला पशुसंवर्धन, दूध विकास व्यवसाय मंत्री व वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, माजी राजेंद्र मुळक, सलील देशमुख, नानाभाऊ गावंडे, रमेश बंग, हुकुमचंद आमदरे यांची उपस्‍थिती होती.

ना. अनिल देश्‍ामुख म्‍हणाले, अॅड. वंजारी यांना पदवीधरांच्‍या प्रश्‍नांची जाण आहे. त्‍यांच्‍या न्‍याय्य हक्‍कासाठी प्रभावीपणे काम करण्‍याचा त्‍यांच्‍यात विश्‍वास आहे. पदवीधरांचा आवाज बुलंद करण्‍यासाठी या निवडणुकीत त्‍यांना निवडून द्या, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी यावेळी केले.

पदवीधरांच्‍या आयुष्‍यात परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी या निवडणुकीला उभा आहे. तुमचे सहकार्य हिच माझी शक्‍ती आहे. तुमच्‍या हक्‍कासाठी मी लढेन, असे अॅड.वंजारी म्‍हणाले.

त्‍यानंतर भंडारा येथे जिल्‍ हा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक घेण्‍यात आली. या बैठकीला प्रमुख अतिथी म्‍हणून माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी मंत्री विलास श्रृंगारपवार, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्‍ट्रीय कॉंगेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, नंदू कुर्झेकर, प्रभाकार सपाटे, तुरकर यांची उपस्‍थिती होती.