| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jul 5th, 2019

  नामकरण प्रस्तावाबाबत उपमहापौरांनी घेतला आढावा

  नागपूर: नागपूर शहरातील विविध चौक, रस्ते यांना मान्यवरांचे नाव देण्याबाबत नगरसेवक/नगरसेविका तसेच विविध सामाजिक संघटना यांचेकडून प्राप्त झालेले अनेक नामकरण प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निर्दशनास आल्यामुळे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी हे प्रस्ताव मार्गी काढण्यासाठी प्रशासनातर्फे काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत गुरुवारी (ता.४) आढावा बैठक घेतली.

  बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक व नामकरण समिती सदस्य सुनील अग्रवाल, विकासयंत्री सतीश नेरळ, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, झोनचे उपअभियंता विजय गुरुबक्षाणी, मनोज सिंग, कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

  यावेळी उपमहापौरांनी सर्व झोनमध्ये नामकरणासाठी प्राप्त झालेल्या प्रकरणांची माहिती जाणून घेतली व सर्व संबंधीत उपअभियंतांनी प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन परिपूर्ण माहितीसह याबाबतचा अहवाल त्वरीत विकासयंत्री मार्फत सादर करावा, असे निर्देश दिले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145