नागपूर : पोलिओ निर्मूलन अभियानांतर्गत आज संपूर्ण शहरात पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. नेहरूनगर झोनमध्ये आरोग्य उपसभापती नागेश सहारे यांनी बालकांना पोलिओ डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.
उपसभापती नागेश सहारे यांनी सक्करदारा आणि ताजबाग केंद्रावर बालकांना पोलिओ डोज पाजला. देशाला पोलिओमुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतात पोलिओ निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. या देशात पोलिओचा एकही रुग्ण भविष्यात नसावा, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. नागपूर शहरातील सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोज द्यावा, असे आवाहन श्री. सहारे यांनी यावेळी केले.
आज काही कारणामुळे ज्या बालकांना पोलिओ डोज पाजता आला नाही अशा बालकांना आरोग्य विभागाचे कर्मचारी २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान घरोघरी भेटी देऊन पोलिओ डोज पाजतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Advertisement

Advertisement
Advertisement