Published On : Thu, Apr 4th, 2019

उपअभियंता डी.पी. चिटणीस यांच्यासह मनपाचे २५ कर्मचारी सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागात कार्यरत उपअभियंता डी.पी. चिटणीस यांच्यासह मनपातील विविध विभागात कार्यरत २५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना शनिवारी (ता. ३०) सेवानिवृत्ती निरोप देण्यात आला.

महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित निरोप समारंभाला सहायक अधीक्षक (साप्रवि) मनोज कर्णिक, नितीन साकोरे, दत्तात्रय डहाके, विधी अधिकारी ॲड. व्यंकटेश कपले, संजय मेंढुले, अग्निशमन विभागाचे सुनील राउत, डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक, दिलीप तांदळे, राजेश जामनकर उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते उपअभियंता डी.पी. चिटणीस यांच्यासह सर्व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये जलप्रदाय विभागाचे उपअभियंता डी.पी. चिटणीस, रिपोर्टर शेषपाल हजारी, आयुर्वेदिक कम्पाउंडर यु.पी. चव्हाण, कर व कर आकारणी विभागाचे निरीक्षक आर.आर. चरपे, कनिष्ठ लिपीक एस.एस. कांबळे, मोहरीर शरद खानोरकर, मुख्याध्यापक प्रदीप चरडे, सहायक शिक्षिका प्रभा लांडे, सहायक शिक्षिका रेखा गिरी, सहायक शिक्षक राजेश जंगले, सहायक शिक्षक रामदीन बारंगे, सहायक शिक्षक शेख महबूब शेख ईशाक, शिक्षण विभागातील यु.टी.डी. संजय शेंडे, एल.टी.डी. रेहाना परवीन, मजदूर शंकर मोहाडीकर, हेल्पर अरुण चौधरी, मजदूर सैय्यद मुजफर अली वल्द अजगर अली, माळी मनोहर केवटे, चौकीदार कम चपराशी तारा मोहाडीकर, चौकीदार सुभाष दांडेकर, सफाई कामगार लिला बिरहा, गौतम शंभरकर, अशोक समुंद्रे, गोविंदा गजभिये यांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement