Published On : Thu, Oct 31st, 2019

मनपातील उपअभियंता सी.आर. गभने व खत्रींसह सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून गुरुवारी (ता. ३१) २० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनिमित्त मनपाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशी रोप आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

मनपाचे सहायक निगम अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेंशन) नितीन साकोरे यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्तींमध्ये लोककर्म विभागाचे उपअभियंता के.बी. खत्री, उपअभियंता सी. आर. गभने, सहायक शिक्षिका अश्विनी बतकी, सहायक शिक्षक सुरेंद्र जाधव, सहायक शिक्षक शारदा गुजर, सहायक शिक्षिक राजेंद्र दुरुगकर, ज्येष्ठ श्रेणी लिपिक पी. डब्ल्यू तळोकर, राजस्व निरीक्षक डी. एल. धुमाळ, मोहरीर सुनील कनोजिया, कर संग्राहक ए. व्ही. वैद्य, हवालदार एन. जे. पांडे, मलवाहक जमादार वाय. एन. मेश्राम, मनोहर कांबळे, चपराशी सुमन मांडवगडे, अरुण पोहरकर, गोपाल बारापात्रे, मजदूर भाऊराव गेडाम, रेजा मनदा कवठे, सफाई कामगार बुधिया सिरकिया, मजदूर रामलखन वर्मा यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, किशोर तिडके, दिलीप तांदळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.