Published On : Fri, Jun 2nd, 2023

पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन ठरले अपघातग्रस्तासाठी देवदूत…

कारमधून नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये केले दाखल
Advertisement

नागपूर : पोलिस उपायुक्त (डीसीपी) मुम्माका सुदर्शन शुक्रवारी पहाटे अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीसाठी देवदूत ठरले. घटनास्थळी अपघातग्रस्त व्यक्तीला रक्ताच्या थारोळ्यात पाहत सुदर्शन यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन दिले. जखमी व्यक्तीला पाहताच कोणताही वेळ वाया न घालवता त्याच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांनी आपल्या कारमधून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या व्यक्तीचा तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दोस्ता वैश्य मेट्रो स्टेशनजवळ ओघात झाला. तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्याने माखला होता. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एकही नागरिकाने त्याची मदत केली नाही. तसेच कोणीही आपत्कालीन सेवा (112) डायल करून पोलिसांना कळवले नाही.

पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन हे पारडी मार्गावरून जात असताना रस्त्यावर त्यांना गर्दी दिसली. ते घटनास्थळी दाखल झाले वेळेचा विलंब न करता त्यांनी जखमी व्यक्तीला आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीने मेयो रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त व्यक्ती गंभीरीत्या जखमी झाला होता खूप रक्त गेल्याने त्याची प्रकृती खालावत चालली होती. डीसीपी मुम्माका सुदर्शन यांनी जर त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केले नसते तर त्या व्यक्तीला प्राण गमवावे लागले असते.

नागपूर टुडेशी बोलताना पोलिस उपायुक्त मुम्माका सुदर्शन यांनी अशा गंभीर परिस्थितीत अपघातग्रस्तांना लोकांकडून मदत मिळत नसल्यामुळे निराशा व्यक्त केली. समाजासाठी आपल्याला काही तरी देणे आहे याअनुषंगाने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजात प्रगती होईल. नागपूर पोलिसांच्या उच्च पदस्थांनी पोलिस उपायुक्तमुम्माका सुदर्शन यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

– शुभम नागदेवे