नागपूर. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १६ (ड) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी २४ जुलै रोजी माजी महापौर श्री संदीपजी जोशी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विशेष अतिथी म्हणून सराफ कोचिंग क्लासेसच्या सौ. सुषमा सराफ, पाटील कोचिंग क्लासेसचे श्री अनिकेत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाग क्रमांक १६ चे संयोजक श्री मनोजजी देशपांडे, प्रभाग क्रमांक १६ (ड)चे अध्यक्ष श्री गजानन निशितकर, श्री अजय डागा, श्री विनोद शिंदे, श्री. जयंत आदमने, श्री नीरज दोंतुलवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १६ (ड) मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. राधिकाताई जलताडे, सौ कविता देशमुख, सौ हेमा आदमने, सौ संध्या अढाळे, सौ पुष्पा शिंदे, साधना शुक्ला बेबी सिंग संपदा बोंडे श्री विनोद शिंदे, श्री मनोज फणसे, श्री श्रीधर जलताडे श्री राजीव रोडी श्री आनंद टोळ, श्री निरंजन गाडगीळ, हेमंत कुळकर्णी अजय गाडगे संजय देशपांडे पराग जोशी कीर्ती पुराणिक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. नीरज दोंतुलवार यांनी केले.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





